कथा.. अल्बीना 💐
#कथा स्पर्धा..प्रेम कथा..
💃🏾अल्बीना..
.. धावत पळत.. अप्पा धावत्या गाडीत चढले...
एक युवती खाली वाकून बुटाची लेस बांधत होती.
अप्पांनी अदबीने विचारले,
' मी येथे बसु का ?"
तिने मान वर करताच..
दोघेही आश्चर्याने,
" अल्बीना, तू?"
"अप्पा , तुम्ही?"
रुक् .. झुक्.. झुक्.. झुक्..
गाडीने वेग घेतला..
फलाटा बाहेर गाडी धावू लागली..
ललाटावरील भूतकाळातील रेषा.. अल्बीना वाचू लागली...
अल्बीनाला आई.. अप्पांची पहिली भेट आठवली...
सँटीनचा मऊ मखमली निळ्या रंगाचा पांढरी जाळीदार फ्रीलचा तोकडा फ्राँक.. जेमतेम मांड्या झाकलेला , निळे मोजे , निळे जांभळे शूज..
उघड्या गळ्यात क्राँस !
अशी मी त्यांना shake hand केले.
तरी सुद्धा शी.. च्या आई.. अप्पांनी मला आपलं मानलं!!!
कारण.. त्यांच्या श्रीकांत ची निवड.. ती आपली आवड समजून !
एकदा.. घरात गणपती बसले असताना..
I can't live without fish !!!
म्हणून बिनधास्त मासे तळले.!!!
तरीही आई.. अप्पा मुग गिळून बसले.
रोज रात्री ड्रिंक्स घेणे..
सिगारेटची वलये सोडणे..
शी.. च्या गळ्यात हात घालून बसणे.. फिरणे..
क्लब मधे जाणे..
सारे सारे त्यांनी सोसले !
आमच्या लग्नाला तीन वर्षे झाली.. तेव्हा आई म्हणाल्या..
"एक बाळ यावे आता घरात !"
तर मी केवढा आकांडतांडव केले..
प्रथमच.. प्रचंड वादळ उठले..
आई वीजेसम कडाडल्या.
अप्पा भडकले. माझा शी..
तो पण त्यांच्या बाजूने बोलला.
मी रागाने माहेरी निघून आले ...
गाडीने वेग घेतला..
पळत्या झाडांसह अप्पांचे विचार.. गत काळातील घडामोडींचा मागोवा घेऊ लागले..
अप्पांना आठवलं..
अल्बीनाचा ग्रुह प्रवेश.
तोकडे कपडे, भडक मेकअप, अतीव मोकळे मोकाट वर्तन.. मित्रांसोबत नर्तन ! सतत धुम्रपान !
संतापजनक म्हणजे ..
श्रीकांत ला लाडाने शी..
म्हणणे !
सासुला नावे ठेवणे..
बकरी सारखे पाला काय खाता..Spicy meat खाऊन तर बघा !! ! हे उद्गार!!!
हे सारे आपण उघड्या डोळ्यांनी.. बघीतले..
कानांनी .. साहीले..
एकदा चुकून तिच्या कडे नातवंड असावे अशी इच्छा व्यक्त केली तर अल्बीना ने केवढा धिंगाणा
घातला!
खरचं चुकलचं आपलं..
श्री एकटा पडला!!!
आज Sorry म्हणावे का अल्बीनाला ? येईल का ती परत घरी ?..
सासरे.. सून.. समोरासमोर बसले होते. एकमेकांच्या नजरा चुकवत होते खरे पण मनात विचार मात्र करत होते..
वेटर.. आला..
" नाष्टा.. ?
अप्पांनी नकळत आँर्डर दिली...
ब्रेड आँमलेट..
कोल्ड काँफी !!!
अन् एक सिगारेट पँकेट
( अल्बीना साठी )
....
अल्बीना ने आँर्डर दिली..
एक आलू पराठा, प्लेन राईस, डाल फ्राय..
(अप्पांसाठी)
अर्ध्या तासाने जेवण येणार..
अल्बीना बघत होती..
गाडी डोंगराच्या पोटातून.. दऱ्यांच्या पाठीतून.. सागराच्या डोक्यावरुन..
वाळवंटाच्या बाहुतून.. हरित रानाच्या कुशीतून..
लचकत.. मुरडत.. शीळ घालत..सर्व डब्यांसह, मार्ग क्रमण करते..
खूपच छान संदेश देते..
रडत.. कण्हत.. कुंथत न बसता.. सर्वांसह सुकर वाट बनवावी !!!
गाडीने U turn घेतला.
हिरवी कुरणे डोलत होती.
अप्पांना.. खोकल्याची ढांस आली..
अल्बीनाने.. त्यांना पाणी दिले. पाठीवरुन हात फिरवला!!!
अचानक तिने विचारले,
" अप्पा शी... sorry.. श्री. कसा आहे ?"
अप्पा उत्तरले.... "कसा ? जलाविना जसा मासा तसा.. तुझ्या विना!
तडफडतो ग तो!
अन् आम्ही तळमळतो!
तुला काय त्याचे?"
नाही अप्पा.. तसे नाही.
मी पण तळमळते त्याच्या साठी!मला आईची, तुमची, घराची, बागेची एवढेच नाही तर टाँमीची पण आठवण येते.
I really miss you all !
& feeling very guilty!
मनापासून वाटतयं का परत घरी यावे असे ?
अग..
भारतीय संस्कृती त.. फारकत नसते.. मोडतोड नसते. तडजोड असते.
चुकलं पाखरु घरट्यात आले, तर माय पदरात घेते.
वेटर.. आला. दोघांनी एकमेकाची आवड जपली.
हासत.. एकमेकांना वाढत... दोघे मिळून जेवले.
अप्पांनी सिगारेट पँकेट अल्बीनाला दिले..
ती चमकलीच..
WOW. ! Classic ice Burst !!!My favourite .. menthol flavor...
अप्पा... So nice of you.
पण... तुम्ही दिले म्हणून एक सिगारेट घेते.
अन् शपथ घेते..
यानंतर सिगारेट बंद!बंद!
रविवारी मी कायमची तुमच्या.. नाही.. नाही.. आपल्या घरी येणार..
अन् मला ही आवडेल श्री च्या बाळाची आई व्हायला..
तुम्ही म्हणता ते खरे आहे..
तनावरच्या जखमेवर लावतात मलम...
अन् मनावरच्या जखमेवर..
प्रेम .. तरल.. तलम।
दोन पाखरांची .. फोनाफोनी.. किलबिल..
आईंनी घर साफ केले. पडदे बदलले..सेंट फवारले. रांगोळी घातली.
दारात.. उंबरठ्यावर चांदीचे भांडे पालथे घातले. तुळस तरारली.. कर्दळ लाल फुलांसह नाचू लागली.. गुलाब बहरला.. बकुळ शहारला..
आनंदाने घर दार नहात होते..
दारात.. चक्क काळी चंद्रकळा नेसून, दागीन्यानी मढलेली.. अल्बीना श्री सह उभी होती...
भाळी चंद्रकोर खुलत होती. कंकणे किणकिणत होती.. नथ चमकत होती गजरा महकत होता..
त्याहून चमकत होती..
शुभ्र दंतपंक्ती !
आईंनी ओवाळून तिला बाहुपाशात घेतले.
तिने वाकून नमस्कार केला. ..
सर्वाना तिळगूळ दिला.शब्द हवेत तरंगत होते..
' तिळगुळ घ्या, गोड गोड बोला '....
श्री.. तिच्या कानात कुजबुजला..
श्री अधुरा.. तुझ्या विना..
.. अल्बीना..
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment