धीर.. धरी...💐

🌿धीर.. धरी..
नीला काळी साडी नेसून, साज श्रुंगार करून वाट बघत होती.. अनुपचा फोन आला होता..

" निघालो आहे.. अर्ध्या तासात पोचतो..गजरा घेतोय... "

अर्धा तास होऊन गेला. काळोख दाटत होता. शांततेमुळे घडाळ्याची टिक् टिक् ऐकू येत होती. धडधड वाढत होती. नसत्या शंका कुशंकांची गर्दी मनात झाली होती.
आत.. बाहेर..चालू होते.

फोन खणखणला..
अनोळखी आवाज..
" *** *** आपले नातेवाईक? I card वरुन नाव समजले.अपघात झाला आहे."

विना गिअरची दुचाकी नुसता अँक्सिलेटरवर हात ठेवला तरीही चालते.. त्या मुळे चालत्या गाडीवर.. धावत्या रस्त्यावर.. एका हातात मोबाईल घेऊन बोलण्याची सवय नडली.
लक्ष विचलीत झालं..
एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं !!!

वाहून चालवताना मोबाईल वर बोलणे..
म्हणजे.. स्वतः हून काळाला आमंत्रण देणे !
थोडा धीर धरुया...
वेगाला आवरुया...
वेळीच सावरूया !!!

वाहन चालवताना लक्षात ठेऊया...
कुणाचा तरी जीव तीळ तीळ तुटतोयं.. आपल्या साठी..
धीरा.. धीराने.. संयमाने..
बांधायच्या आहेत.. गोड गोड गाठी !!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme