स्वागत.. भूतपूर्व राष्ट्रपतींचे..
🌹स्वागत...
पुणे हे विद्येचे माहेर घर!अन् आज त्या पुण्याला एका विद्यावाचस्पतीचा साक्षात प्रणव स्पर्श झाला..हे आम्हा पुणेकरांचे परम भाग्य होय !!!
आम्ही सर्व सेवाभावी डाँक्टर्स आहोत...
रूग्णांचे शल्य दूर करून संजीवन प्राप्त करून देणे यासाठी आज आम्हाला ऋषीतुल्य श्री. प्रणवजींचे आशीर्वाद हवेतच!
फुलाने न सांगताच.. आपण त्याचा सुगंध घेतो.
तद्वत.. स्वगुणांच्या बळावर ..विदेश मंत्री,संरक्षण मंत्री,वाणिज्य मंत्री,अर्थ मंत्री, इ. खात्यातील त्यांच्या प्रतिभेने..सर्व समावेशक व्रुत्ती ने प्रणवजींना सर्वोच्च बहुमानाचे.. राष्ट्रपती.. पद बहाल केले गेले.
अन् त्या पदावर असूनही..
नाही लागला त्यांना .. अह़ं.. वारा..
दिसून आली.. सोहम् ची सुंदर सुखद धारा...
इतिहासाचा मागोवा घेऊन राजनीती आत्मसात करुन..
समाज बांधणीसाठी अर्थिक धोरणे अवलंबून...
जगातील पाच अर्थ मंत्र्यांपैकी एक ..
श्री. प्रणवजी हे झळाळते रत्न ठरले!!!
याचा आम्हा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.
संविधानातील प्रतिष्ठित मूल्यांची पायमल्ली होऊ न देता ती जपणे.. यासाठी ते झटले.
त्याच तत्वाने .. न्याय बुद्धी ने त्यांनी आंतरराष्ट्रीय अर्थिक धागे बळकट केले.
उत्तम वक्ता, संसद पटु, न्याय प्रवीण, लेखक, संघटक .
सर्व दूर शिक्षण, स्त्री संरक्षण, संस्कृती संवर्धन इ. बाबतची मते ते उत्कटपणे मांडतात.
जनमनाला भीडतात.
भ्रष्ट राजकारणात राहून सुद्धा काचेसम स्वच्छ पारदर्शक विचार असल्याने...
अमल उत्पल दल ...ठरले!!!
Destiny is not created by the shoes we wear..
But by the steps we take !!!
हे तंतोतंत प्रणव जींना लागू पडते.
ते वयोज्येष्ठ असले तरीही कर्मठ नाहीत. नवतंत्राशी जुळवून घेण्याची मानसिकता त्यांच्या ठायी ठायी आहे.
जीवनाकडे बघण्याचा एक परिपेक्ष द्रुष्टीकोन त्यांनी आम्हाला दिला.
प्रणवजींचे वय म्हणे.. 85+ आहे.!!!
छssट् .. मलाच नाही.. तर प्रत्येक भारतीयाला ते अवघे.. 40 वाटते !
अमाप उत्साहाचा झरा सदैव सळसळत राहो ..
कर्म़ निष्ठ.. रुबाबदार व्यक्तीमत्वास..
मी.. नतमस्तक होऊन..
दो हस्त जोडून .सादर प्रणाम करतो. मनोमन सर्व डाँक्टर्स च्या वतीने स्वागत करतो. व शतशः आभार मानतो !!!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment