पतंग..💐
🍀 चार भुजा अन् चार कोनात सामावलेला पतंग व्यापारिकरणात अडकला. आता तो अनेक विध आकार धारण करतो.. करोड़ों रुपयात भिरभिरतो. गोते खातो. चित्ताकर्षकता कमी झाली व वित्ताकर्षता वाढली . आता कागदी न राहता.. सोन्या चांदीच्या जरीचे, हिरेजडीत पतंग लाखो ₹ ना विकले जातात. गुजरात मधे पतंग महोत्सवास परदेशातून पर्यटक येतात ... लाखों ..करोड़ों चा व्यापार होतो.. स्पर्धा जिंकण्यासाठी जीवावर उदार होतात.. तेंव्हा जीव तीळ..तीळ तुटतो ! रात्री..पतंगात विजेरी छोटेछोटे दीप लावून आकाशात सोडतात.. ता-यांहूनही सुंदर ही नक्षत्र माला दिसते !
पतंग ..आकाश व पृथ्वी यांचे संधान बांधतो ! तर तीळगुळ मना मनाला सांधतो !
पतंगास साहित्यात मानाचे स्थान आहे.. षड् रसात नखशिखांत भिजलेल्या पतंगाला ज्ञानेशाने ओवीत, कबीराने..दोह्यात.. मीरेच्या भजनात.. गुंफले ! तुकाराम तर म्हणतात.. मी पतंग ... तुझ्या हाती धागा.. धागा आवरा..पांडुरंगा...
तर.. गीतसम्राट .. जगदीश खेबुडकरांनी...
असा बेभान सुटला वारा...
वर पतंग बारा..तेरा..
एकमेकाना अडवीत होते...
ग ..बाई..मी .. पतंग उडवीत होते !
लिहून बहार उडवून दिली...
अभंग वा लावणी ... आशयघन ! संयमाचा धागा धरावा.. आपसुक होईल गोडवा !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment