श्री.गणेश आरती..💐

🌹श्री. गणेश आरती🌹
विद्यापती तू विश्वनायका ।
संतुलन शांती देई भाविका।।ध्रु।।

विज्ञान युगी स्वार्थाचा भाव।
अहंकार मनी, वाढली हाव।।
प्रदुषणाने घातला घाव।
मानवतेचाही त्यात अभाव ।।1।।
विद्यापती तू...

तनामन शुद्धीचा होतसे ऱ्हास।
दिखाऊ व्रुत्तीचा चढतसे कळस।।
यंत्र वापराने ,वाढले रोग ।
मंत्र कष्टाचा दे.. सरावे भोग।।2।।
विद्यापती तू...

चंगळवादाचे अनेक आवर्त।
थैमान घालती बाल.. थोर सर्वत्र ।।
भ्रष्टता नष्टुनी, व्हावे सारे इष्ट।
अंतर्बाह्य चित्र दिसावे स्पष्ट।।3।।

विद्यापती तू, विश्वनायका।
संतुलन.. शांती देई भाविका ।।
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme