गंध...💐

🌹🌹 गंध 🌹🌹
टपोऱ्या मोत्यांची व्रुष्टी..
म्रुदगंधाने भारते स्रुष्टी ।

हरित पर्णोपर्णी गंध मोगरा..
जणू नभीचा शुभ्र तारा।

प्राजक्त सडा बुंध्याशी..
गंध गूज करे आकाशी।

गुलाबाची गंध पाकळी..
प्राचीच्या गाली खुले लाली।

सांडुनी विष नाचे भुजंग..
केतकी गंधात होई दंग।

निशीगंध जागवी तमाला..
जोजवी विखारी सर्पाला।

षड्रसांचे गंध नाना..
चाळवताती.. रसना।

चंदन गंध मनभावन..
चर्चुनी .. वंदुनी होऊ पावन।

स्वर ..व्यंजन बद्ध अक्षर गंध..
शब्द माळांचा लागे छंद।
उन्नती गाडगीळ.🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme