तत्पर...💐
🍀 ३-४ दिवसांपूर्वी...सायंकाळी माझे मिस्टर दोन मित्रांसह फिरत होते ...footpath वरुन चालत होते..अचानक ९-१० वर्षीय मुलाची साइकल त्यांच्या पायावर आली...नुकतेच थंडी ने टाटा केल्यामुळे साँक्सव शूजला फाटा दिला होता...व चप्पल पायात होत्या...त्यामुळे ठेच जोरात लागली...जखम झाली ...लगेच गर्दी जमली... त्या चिमुकल्याला दोषी ठरवून दमदाटी सुरु झाली ! मिस्टरांनी जमावाला हात जोडून सांगितले, " सोडा त्याला...चुकून तो माझ्या पायावर आला . तो लहान आहे!"
जमाव पांगला ... मित्रांसह हे घरी यायला निघाले तोच तो चिमुकला म्हणाला , " आजोबा , माझी सायकल संभाळा , मी आलोच ! तो तीरासारखा पळाला...दुकानातून २ painkillers, २ band aid... व , रिक्षा घेऊन आला ! सर्वाना घरी सोडले ,! मी दार उघडताच त्या मुलाने मला मिठी मारत ...रडत...आजी, Sorry! म्हणले !
मला सारे समजले...त्याला आईने ब्रेड ,बटर, साठी दिलेल्या पैशात त्याने... Band aid वगैरे आणले ! मला खूपच कौतुक वाटले ! मी त्याला खायला तर दिलेच अन् पैसे पण दिले !
सुदैवाने मिस्टरांची जखम मामुली होती ! नंतर २ दिवस तो मुलगा येत होता... सतत म्हणायचा," आजोबा , तुम्ही माझी बाजू नसती घेतली तर मला सर्वानी खूपच मारले असते !"
चूक कुणाची हा प्रश्न गौण ! दिसून आले चिमुकल्याचे संस्कार!!!
उन्नती गाडगीळ 🌷 🙏

Comments
Post a Comment