भाषांतर.. की.. भाषेत अंतर ?💐

🌿भाषांतर ? की भाषेत अंतर..???

F.B.वर.. Write something here..
येथे काहीतरी लिहा...

असे शब्दशः भाषांतर दिसते. त्यामुळे मनात संभ्रम निर्माण होतो...
नक्की यांना काय अपेक्षित आहे बरं ?

काहीतरी.. हा शब्द कुशलतेने काव्यात गुंफला तर..एक लाजरा साजरा मुखडा डोळ्यासमोर येतो.उदा..
*काहीतरी होऊन गेलयं आज..(काय बाई सांगू .. कसं ग .. सांगू.. )**
पण.. काहीतरी हा शब्द गद्यात घातला तर ..
खरडा काहीतरी.. करा शब्दांचा भरडा..असा अर्थ ध्वनित होतो अन् लेखनाचा मूडच जातो.
असं वाटतं.. काहीतरी.. म्हणजे. .. लिहा एकदाचं..
रटाळ, गचाळ, शिवराळ,खट्याळ, वगैरे...

शब्दशः भाषांतराचे एक गंमतीदार उदाहरण प्रचलित आहे..

*बोलून, चालून, शिवाजी शूर योद्धा होता !*
 Talking walking Shivaji was a barve man !!!
हे झाले शब्दश: भाषांतर!
शब्दाचा अर्थ लिहीला. आशय लुप्त झाला.

तसेच like या  शब्दाचा अर्थ आवडणे.

पण..  F.B., Website, वगैरे ठिकाणी..
 Like चा अर्थ ..
वाचले.. पाहिले.. ठिक..
असा ध्वनित  होतो...

असो.. मित्रहो..
आज मी येथे काहीतरी लिहीले आहे.
पण तुम्ही सर्व जण मात्र विचार पूर्वक.. अर्थपूर्ण प्रतिसाद देणार ...
*काही तरी* नाही देणार याची खात्री आहे.
उन्नती गाडगीळ 🙏🌹

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme