पडसाद..💐
♥पडसाद..
रोज सकाळी 7 वाजता रंजनाच्या स्कुटीचा हाँर्न ऐकू येतो.
आज हाँर्न न देता.. ती धाडकन घरात आली व
हमसून... हमसून .. रडत..
" ताई.. कालच्या बंद वाल्यांनी.. मेल्यांनी माझी स्कुटी जाळली.
आता मी रोज चालत कशी येणार हो कामाला?
ताई..9 वर्षे झाली.. तुम्ही सर्व मालकिणींनी मिळून पैसे गोळा करून मला स्कुटी घेऊन दिली.
पल्लवी ताई नी शिकवली.
तुम्ही माझ्या दोन्ही पोरांना फुकट शिकवता.
मला पण तुम्ही फोन, w.a. सारे शिकवले.
मंगलाताई, अरुणा ताई मला .. कपडे देतात.
बँक.. पोस्ट.. सारे शिकवले.
जोशी काकांनी माझ्या नवऱ्याला नोकरी दिली.
आमचं सारं घर ..तुमच्या काँलनीमुळे हासतं...खेळतं ... लिहीतं.. वाचतं!
आज स्कुटी जळली.. आता आमच्या पोटावर पाय आला....
रोजचा.. भाजीवाला.. फुलवाला.. रोजगार..
सारेच कुरकुरत होते..
बंद .. मुळे सारा माल अंगावर पडला.
हातावर पोट आहे आमचं..
वगैरे..
खरचं....
हातात लेखणी धरून, सुंदर विचार मांडणारे हात..हातात छन्नी घेऊन, सुबक कलाकृती करणारे हात...
हातात खडू घेऊन.. मुलांना घडवणारे हात..
हातात.. सुई धागा घेऊन, फाटकं सुद्धा नेटकं करणारे हात...
हातात विळा घेऊन मातीतून मोती काढणारे हात...
हातात झाडू घेऊन..परिसर स्चच्छ करणारे हात..
हातात.. चामडे घेऊन.. अनेक पावले दमदार करणारे हात...
हातात.. यंत्र घेऊन.
नवतंत्र आत्मसात करणारे हात...
असे अनेक हात..
साक्षात लक्ष्मी चे वसती स्थान !!!
अन् तेच वरद हस्त..
काल.. वाहने जाळत होते.
काचा फोडत होते..
लाठ्या मारत होते..
बाल.. तरू.. तुडवत होते..
दगड.. धोंड्यांचा वर्षाव करत होते..
सजीवांशी खेळत होते..
रक्त सांडत होते..
दहशत निर्माण करत होते!
विवेकविचार हरवले होते !
आता बंद पाळताना.. निदान...देशाचं करोडो रू. च नुकसान होणार नाही..अन्
कुणाच्या काळजाचा तुकडा हिरावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक.
बंद पाडताना.. दगड फेक, जाळपोळ, नासधूस, रक्तपात हे सारे बंद.. करू
त्या दिवशी आपण सारे खरे खरे साक्षर.. सक्षम होऊ..
उन्नती गाडगीळ🙏🌹

Comments
Post a Comment