मन मोकळं..💐

🌺मन मोकळे..मंडळातील मीनाताई सांगत होत्या...
शेजाच्या अभि चे लग्न खूप थाटामाटात पारपडले . नंतर तीन दिवसांनी..
युरोप ट्रीप.. सर्व तयारी झालेली..
हास्य,विनोद, थट्टेची कारंजी उडत होती.

अन् अचानक अभिने जाणार नाही सांगितले.
आँफीसला ताडकन निघून गेला. नवी नवरी रडत बसली..
मंगलाताई.. सुशिक्षित सासू ! सुनेच्या पाठीवर हात फिरवून मायेने ..

" काय झाले दोघांच्यात ?
अभि असा का रूसला ? अभिचे काही चुकले का?
अग.. तू तयारी कर. मी समजावते त्याला. आत्ता मजा करा !"

सून हमसून रडत..
"आई, मी कायमची माहेरी जाते. चूक माझी आहे. त्याची नाही.
मी फक्त 16 वर्षाची असताना..
संधी साधून.. ***ने माझ्या शरीरावर अत्याचार केला.
अन् धाक दाखवून तोंड बंद केले..
आईच्या लक्षात आले. पण उशीर झाला होता..गुंतागुंतीमुळे  नाईलाजाने डाँ. ना सिझेरियन करावे लागले."

काल अभिला ते दिसले.. सारे कळले.. त्याची चूक नाही... वगैरे..

घटना अत्यंत दुर्दैवी खरी.
तंत्रज्ञान युगात आपण पत्रिका, घर, संपत्ती, भौतिक स्थिती हे सारे बघतो.

पण.. विवाहापूर्वी वधु.. वरांची आरोग्य तपासणी करून घेत नाही.ते चुकते.

विवाहा पूर्वी.. तनामनावर जे अत्याचार झाले ते विश्वासात घेऊन सांगितले.. तर .. ऐन आनंदाच्या परमोच्च क्षणी जो मनाला धक्का बसतो व दोन जीव उद्ध्वस्त होतात ते होत नाहीत.

विश्वास संपन्न करून सांगितले तर ऐकणारे सुशिक्षित मन..

झाले.. गेले गंगेला मिळाले!!!
असा सूज्ञ विचार करु शकते.
आणि.. अजाण वयात काही  आघात.. घडलेले.. बघीतलेले.. ऐकलेले.. पाहिलेले.. जर मनातच ठेवले तर.. ती व्यक्ती जन्म भर मन कुरतडत.. कुढत ..घुसमटतं राहते.सुखाची देव घेव करु शकत नाही.

मी अभिच्या आईना भेटले.
कारण त्या पारदर्शक विचार करू शकतात.
वरीलप्रमाणे.. चर्चा चर्वण करून..
त्या मुलीची अगतिकता.. तिच्या वर झालेला अन्याय यावर अभिनेच समर्थ फुंकर घालणे जरुर आहे.
हे त्याला.. त्याच्या अंतराला.. पटले.
दोन जीव.. झाले गेले विसरून... मधुचंद्र साजरा करायला गेले ..
.
तनामनाचे आरोग्य तपासून.. मग मोकळे होऊन विवाह बंधनात गुंतणे आवश्यक.!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme