व्यावसायिक भाट..
🍀 व्यावसायिक भाट....
अलिशान चष्म्याची show room...गुबगुबीत सोफ्यात मी रुतुन बसलेली...माझ्या समोर मखमली पेटीत .. सहा फ्रेम्स ...मी एकेक फ्रेम लावून नक्षीदार आरशात निरखत होते...पतीची ..प्रतिक्रिया पहात होते...विक्रेत्याने
बिनधास्त विधान केले,
" Madam , fantastic !!! You are looking so smart !"
मला खूप हसू आले... फक्त पुरुष विक्रेते बिनथास्त... स्त्री ला तिच्या पतीदेखत... सुंदर दिसता ...म्हणतात ! खुशामद करणे हा त्यांचा व्यावसायिक फंडा ...मग ती पेढी असो..वा ...Cool.. .Cool Show Room !!!
विक्रेता म्हणणारच..." मॅडम , हा हिरा तुम्हास जास्त खुलून दिसेल !"
वयोमानाने केसाची दुर्वाची जुडी झाली तरी गजरेवाला म्हणतोच ," काका, गजरा घ्या न, काकूना छान दिसेल ! "
साड़ी विक्रेते तर...स्वत: साड़ी नेसतात व स्त्रियांना म्हणतात , " ही घ्या , हा रंग तुमच्या वर खुलेल !!!
कासार तर...पती समोर त्याच्या पत्नी चा हात हातात घेऊन,
" काय मऊ लोण्यावाणी हात हाय हो ! या वर्खाच्या बांगड्या खास तुमच्यासाठी मागवल्या राजस्थान हून !!!"
पती देव बिचारे गालात हासत असतात !
धंद्याचा फंडा समजून घेतात ... पण स्त्रिया मात्र सुखावून विकत घेतच राहतात... उच्च शिक्षित मनाला सुद्धा ...ही खुशामत आहे हा विचार शिवत नाहीं ... खरेदीच्या जाळ्यात मनाची मासोळी होते ...
उन्नती गाडगीळ 🌷 🙏

Comments
Post a Comment