प्रिय सखी... 💐

🌸प्रिय सखी...

कशी आहेस ग सखी..तू?
अशी का बरं दिसशी .. उदास..उदास  . तू ?

रजोनिवृत्ती चा तुझा हा काळ..
मनावर आहेत.. शंकाकुशंकांचे वळ।

सांगताही येत नाही.. अन् सहनही होत नाही.. असे काही क्षण..

मासिक पाळीची अनियमितता..आणि संसाराचा वाढते व्याप.. चढते ताप !मग येते अस्वस्थता.. तनामनाला।

त्यातच.. ज्येष्ठांची दुखणी...खुपणी..
आणि.. भावी जीवनाची अर्थिक पेरणी..
त्यामुळे होते.. भावभावनांची कापणी!!

मग.. येते नैराश्य.. लोपते हास्य.. हारते स्वास्थ्य.. अन् ... कशातच नसते स्वारस्य !!!

तेव्हाच आणायचं उसनं बळ..
सोसायची असते.. थोडी कळ !

पूर्वी.. सोसुनि तू कळा.. उमलली.. फुले..
घराचे.. हासरे.. गोकुळ झाले।

निसर्गाने... हे स्त्रीत्व मुक्त हस्ते बहाल केले..
तन बहरले...मन मोहरले।

पत्नी पद मिरवले..मातृपद उपभोगले..सामाजिक स्थान भुषवले..स्त्री जन्माचे सार्थक जाहले!!!

आता.. रजोस्त्रवाची निवृत्ती..
ती.. नाही बाळे..आपत्ती।

वेदना साहत..आंसू पूसत..
वरवर हासत..
निरोप दे..त्या ... रजोस्त्रवाला..
हळवं होऊन चालत नसतं.... खंबीर होऊन लढायचं असत।

Super woman बनण्याच्या फंदात नाही पडायचं..
स्वतःच्या अंतरात आता डोकवायचं।

सर्वच जबाबदारी अंगावर नाही घ्यायची..
आहार..विहार..व्यायाम त्रिसूत्री पाळायची..

कुटुंबाला विश्वासात घ्यायचं..
ओझ्यांचं वाटप करायचं।

ताण न घेता तोल संभाळायचा..
वैद्यकीय सल्ला वेळोवेळी घ्यायचा..

दुखणं अंगावर नाही काढायचं..
शक्यतो गर्भाशय जपायचं... आरोग्याला संभाळायचं।

त्रागा न करता.. विवेक धरायचा..
संसाराचा..कणा समर्थ ठेवायचा।

हासत..खेळत.. आनंदी रहायचं... सर्वांना आनंदी करायच।

रजोस्त्रवाला.. Good bye करतच..
हासत..खेळत.. चालत रहायचं।

धन्यवाद..
उन्नती गाडगीळ.🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme